Site icon e लोकहित | Marathi News

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

Maharashtra defeated Gujarat; Uddhav Thackeray's venomous criticism of BJP

मागील काही दिवसांपासून देशात गुजरात निवडणुकांचा (Gujrat Election 2022) गोंधळ सुरू होता. नुकत्याच या निवडणुका पार पडल्या असून काल बहुचर्चित निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल लागला आहे. यामध्ये सलग 27 वर्षे सत्तेत असणारे भाजपच पुन्हा सत्तेत आले आहे. यामध्येच आता उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा देत टोला लगावला आहे.

शेतीला दुग्धव्यवसाय व शेतीशी निगडित व्यवसायाची साथ असणे आवश्यक; भगतसिंग कोश्यारींचे वक्तव्य चर्चेत

उद्धव ठाकरे म्हणाले, यशाचे मानकरी आहेत, “त्यांचे अभिनंदन करणारच आहोत. मात्र गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचे मोलाचे योगदान आहे, हे कुणी विसरू नये”. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग पळवले, असा टोला देखील ठाकरेंनी मोदींना लगावला आहे.

शिवाजी महाराजांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा अधिवेशनात अपमान; बोलायला गेले आणि…

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील (CR Patil) यांनी सांगितलं की, “गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत”. १२ डिसेंबरला याबाबत शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) त्याचबरोबर अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. गांधीनगर (Gandhinagar) येथे विधानसभेच्या मागच्या मैदानात शपथविधी होणार आहे.

महाराष्ट्रातील पोरांच्या स्वप्नांचा चुराडा केला – रोहित पवार

Spread the love
Exit mobile version