Maharashtra Election 2024 । ब्रेकिंग! शरद पवार गटाची आज लोकसभेची तिसरी यादी जाहीर होणार

Sharad Pawar

Maharashtra Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. तर काही ठिकाणी अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा बाकी आहे. दरम्यान, शरद पवार गटाने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर आज शरद पवार गटाची लोकसभेची तिसरी यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून उमेदवारांची अंतिम यादी होणार जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics Lok Sabha Election 2024)

Ajit Pawar । अजित पवारांनी आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा घेतला चांगलाच समाचार

सातारा, माढा आणि रावेर या जागेसाठी उमेदवारांची नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमधून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना – 21, काँग्रेस – 17, राष्ट्रवादी – 10 असा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला आहे.

Raj Thackeray । राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, ‘निवडणूक लढवणार नाही’

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोवर इतर बडे नेते देखील उपस्थित होते. बीड, बारामती, शिरूर, सातारा, वर्धा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर या १० जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार आहे.

Raj Thackeray । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

Spread the love