Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra election | सर्वात मोठी बातमी! भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणं देखील कठीण?; एक्झिट पोलचा धक्कादायक आकडा

Devendr Fadanvis

Maharashtra election | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट सामना होणार आहे. मतदानानंतरच्या एक्झिट पोल्सनुसार, भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध मीडियाच्या एक्झिट पोल्समध्ये भाजपला केवळ 78 जागांवर यश मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही पोल्सनुसार, भाजपला 100 जागांपर्यंत पोहोचणे देखील कठीण होईल, अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. (Maharashtra election )

Maharastr Voting । सर्वात मोठी बातमी! महारष्ट्रात मतदानाला गालबोट, या ठिकाणी मतदान केंद्र फोडलं, EVM ची तोडफोड

दुसरीकडे, महाविकास आघाडीला यंदाच्या निवडणुकीत भरीव यश मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोल्सनुसार, महाविकास आघाडीला 150 जागांपर्यंत विजय मिळवता येईल, तर महायुतीला 118 जागांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक 60 जागा मिळू शकतात, तर ठाकरे गटाला 44 आणि शरद पवार गटाला 46 जागांवर विजय मिळू शकतो. शिंदे गटाला 26 आणि अजित पवार गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

Baramati news । बारामतीत मतदानावर गदारोळ, शर्मिला पवारांचा गंभीर आरोप, युगेंद्र पवार संतापले

काही एक्झिट पोल्समध्ये महाविकास आघाडीला यश मिळण्याचे अंदाज असल्याने, भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांनी मतदानाच्या प्रक्रियेत थोडं अधिक सक्रियता दाखवली होती. आता 23 नोव्हेंबरला निवडणुका निकाल जाहीर होणार आहेत, आणि त्यानंतरच हे सर्व अंदाज खरे ठरतील की नाही, हे स्पष्ट होईल. पोल्सनुसार महाविकास आघाडीला अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे राज्यातील राजकीय चित्र अधिकच चुरशीचं होणार आहे.

Eknath Shinde | मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार

Spread the love
Exit mobile version