Maharashtra Heavy Rain । दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. अशातच हवामान खात्याकडून संपूर्ण राज्यासाठी पुढील 24 तास अतिमहत्त्वाचे असून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अतिशय भयानक दुर्घटना! संपूर्ण गावावर कोसळली दरड, 60 जण अडकले ढिगाऱ्याखाली
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी कामाशिवाय बाहेर जाऊ नये, असे आवाहनदेखील हवामान खात्याने केले आहे.
हृदयद्रावक! चार महिन्याचे बाळ हातून निसटलं आणि गेलं पाण्यात वाहून
तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने पालघर, पुणे तसेच रायगड, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर रत्नागिरी, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, जळगाव आणि कोल्हापूरमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.