
मुंबईमध्ये (Mumbai) आज आगामी हिवाळी अधिवेशनाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकींनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी सवांद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वेगेवेगळ्या मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर निशाणा साधला.
मोठी बातमी! गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होणार
“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य केले होते त्यावरून देखील शिंदे सरकारला चांगलंच सुनावलं.
मुलीच्या जन्मानंतर आलियाला पाहून चाहते खुश; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
“राज्यपाल कोश्यारी ज्या प्रकारे बोलले आहेत त्यावरुन खोके सरकारने त्यांना पदमुक्त करायला पाहिजे होत. पण अजून कोणत्याच मंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. याउलट कोश्यारी यांचं वक्तव्य झाकावं म्हणून अजून वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत. कदाचित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे देखील यांना वाचवण्यासाठी असेल”, अशी जहरी टीका देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी केली आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पिकांसाठी लागणारी कीटकनाशके आता थेट बांधावर मिळणार