Maharashtra Lok Sabha । ‘या’ तारखेला महाराष्ट्रात पार पडणार मतदान, जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra Lok Sabha

Maharashtra Lok Sabha । सगळ्या देशाचं लक्ष असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha) अखेर घोषणा झाली आहे. आज पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत कशा प्रकारे तयारी केली जाईल याचीही माहिती यावेळी दिली आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Election । सर्वात मोठी बातमी! ‘या’ दिवशी पार पडणार लोकसभेच्या निवडणुका

Ads

देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे तर 4 जूनला याचा निकाल लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान पार पडेल. (Maharashtra Lok Sabha Date)

Cabinet meeting । लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय, पहा यादी

तसेच पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ एप्रिल पासून अर्ज भरता येणार तर २६ एप्रिल २०२४ ला मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात ७ मे ला मतदान होणार आहे. तर १२ राज्यांमध्ये निवडणुक होईल. चौथ्या टप्प्यात १८ एप्रिल नोटिफिकेशन १३ मे ला मतदान होईल. पाचव्या टप्प्यात २० मे ला मतदान होईल. सहाव्या टप्प्यात २५ मे आणि सातव्या टप्प्यात १ जूनला मतदान पार पडेल.

Maharashtra Politics । मविआच्या अडचणी वाढल्या! लोकसभेसाठी आणखी एका पुतण्यानं केलं काकांविरोधात बंड

Spread the love