![Maharashtra once again shocked! After Vedanta-Foxcon, now this giant company will also migrate](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/09/Busniess-1024x538.jpg)
मुंबई : आता महाराष्ट्राला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. आधी पुण्यातील वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn project) तर रायगडातील बल्क ड्रग पार्कने महाराष्टातून काढता पाय घेतला होता, पण आता ऑनलाइन पेमेंटसाठी (Online payment) प्रसिद्ध असलेल्या फोनपे (PhonePe) कंपनीने आपले मुंबई कार्यालय कर्नाटकात (Karnataka) हलवण्याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान आता एवढी मोठी कंपनी राज्याबाहेर गेल्याने राजकारण तापलं आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्याने ‘अशी’ केली कमाल, पावने दोन एकरामध्ये मिळवले तब्बल 22 लाखाचे उत्पन्न
2013 च्या कलम 13 अन्वये कंपनीने आपले नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रातून कर्नाटकात स्थलांतरित करण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमधील दुरुस्तीला मान्यता देण्यासाठी विशेष ठराव मंजूर करण्यात आला होता. PhonePe सारख्या ऑनलाइन पेमेंटसह मोठ्या कंपनीचे कार्यालय कर्नाटक मध्ये गेल्याने मुंबईसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.
यामुळे राज्यातील वातावरण चांगलच तापल आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर PhonePe’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गेल्याची पोस्ट केली आहे. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवारांनी या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारलाही लक्ष्य केलं आहे.
शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी, शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका