Maharashtra Politics । अजित पवार (Ajit Pawar) यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. हा परिसर नेहमीच अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांच्यानंतर अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे हेही शरद पवारांच्या गोटात सामील होणार आल्याच्या चर्चा सुरु आहेत.
वृत्तानुसार, गेल्या वर्षी चिंचवड पोटनिवडणूक लढवलेल्या नाना काटे यांनी काहीही झाले तरी निवडणूक चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यात शरद पवार यांनी सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची घोषणा केली होती. आता याच दारातून नाना काटे घरी परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांच्या ऑफरनुसार तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
Mahindra XUV 700 शी स्पर्धा करणाऱ्या ‘या’ 3 SUV आहेत आश्चर्यकारक; जाणून घ्या भन्नाट फीचर्स
नाना काटे विधानसभा निवडणूक लढवणार?
नाना काटे म्हणाले, “मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची मजबूत पकड आहे. महायुतीचे तिकीट भाजपकडे गेले तरी मी ही निवडणूक लढवणार आहे. मी अजितदादांची भेट घेतली होती, आणि त्यांनी संकेत दिले आहेत. माझ्या मते तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत राहावे, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याचा निर्णय त्यावेळीच घेतला जाईल.
Pune News । धबधब्यात उडी घेताच निवृत्त लष्करी जवान वाहून गेला; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल