मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी कोसळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar) यांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये (Mumbai Munciple Corporation Elections) काँग्रेस महाविकास आघाडी सोबत न लढता स्वतंत्र लढणार असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहेत.
मोठी बातमी : कर्नाटकाचा तिढा सुटला, कोण होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री?
काल (ता.१७) माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ” काँग्रेस ( Congress) पक्षाने या आधीच जाहीर केले आहे की, मुंबई महानगरपालिकेत ते महाविकासआघाडी सोबत लढणार नसून, स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी घटना घडणार आहेत. तिथं काय होतंय हे पाहून इतर पक्ष त्यांची भूमिका घेतील. “
Maternity Leave | खुशखबर ! महिलांच्या प्रसूती रजेत होणार वाढ ; नीती आयोगाने केली शिफारस
तसेच आम्ही वेगवेगळ्या पक्षातील असलो तरी, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) व माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे मला कुठेही जायला वेळ लागणार नाही. असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान त्यांची ही वक्तव्ये अगामी राजकीय भूकंपाचा ट्रेलर असल्याचे म्हंटले जात आहे.