Maharashtra Politics । राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. याचं कारण असं की, मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान असंच काही शुक्रवारी राज्याच्या राजकारणात एका ट्वीटने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मी पुन्हा येईन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
भाजपच्या ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने ट्विट केलेला व्हिडीओ मी पैल नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेतली आहे.
त्याचबरोबर दुसरीकडे उदय सामंत सोडता शिंदे गटाच्या कोणत्याच नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. भाजपने असा व्हिडिओ का ट्विट केला आहे त्यांच्या नेत्यांना विचारावा लागेल अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र शिंदे गटाच्या इतर नेत्यांनी याबाबत कोणती प्रतिक्रिया दिली नाही.
त्याचबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. एका ट्वीटवरुन काहीही संकेत दिले जात नाहीत. यातून कोणताही संकेत देण्यात आला नसल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मात्र सध्या फडणीसांच्या या व्हिडिओची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
Maratha Reservation । मोठी बातमी! भाजप खासदाराच्या ताफ्यातील दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या