राजकीय वर्तुळात मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असताना सध्या एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. दोन दिवसापूर्वी दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये ( Maharashtra Sadan) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सदनातील अहिल्याबाई होळकर ( Ahilyabai Holkar) व सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule) यांचे पुतळे हटविण्यात आले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
मोठी बातमी! चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन सजविण्यात आले होते. यावेळी अहिल्याबाई व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आले. ही बाब महाराष्ट्र आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लक्षात आणून दिली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
” सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर आमच्यासाठी पूजनीय आहेत. प्रत्येक देशवासीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे त्यांचा अनादर केला जाणार नाही. या प्रकरणी अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले आहे. ते लवकरच खुलासा करतील.” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
दिल्लीत धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीवर आधी चाकूने वार, नंतर दगडाने ठेचले अन्… घटना वाचून बसेल धक्का