maharashtra school time change । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळेच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे. सध्या सर्वांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे जर पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या होत्या. यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. (maharashtra school time change)
China Earthquake । ब्रेकिंग! चीनमध्ये मोठा भूकंप, घरे जमीनदोस्त झाली; शेकडो लोकांचा मृत्यू
महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. मात्र माध्यमिक शाळा सकाळी भराव्यात आणि प्राथमिक शाळा दुपारी भराव्यात अशा सूचना शिक्षण तज्ञांकडून येत होत्या. याचं कारण असं की, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय १२ वर्षाच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय ३ ते १० वर्षे असते. याबाबत राज्यपाल रमेश बैस यांनी देखील सूचना केली. यामुळे आता दुसरीपर्यंत प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! विरोधी पक्षाच्या ३३ खासदारांचं निलंबन, नेमकं कारण काय?
त्याचबरोबर, इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे देखील दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर दीपक केसरकर म्हणाले राज्यपालांनी जे मत व्यक्त केले होते त्याबाबत सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.