
Political News । राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Election) पार पडणार आहेत. सर्व पक्षांची निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु आहे. अनेक दिग्गज नेते आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षांतर करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला आहे. (Latets Marathi News)
Ajit Pawar । अजित पवारांना ED चा मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं प्रकरण
ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांनी घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेखाली उडी घेत आपलं जीवन संपवले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. (Sudhir More Death)
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. परंतु सुधीर मोरे यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला खूप मोठा धक्का बसला आहे.
Rule Changes in September । सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका! आजपासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल