
बलात्काराच्या घटनांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे. सध्या देखील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा येथील राजूर घाटात घटना घडली आहे. या ठिकाणी एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
Delhi Crime । महिलेच्या शरिराचे तुकडे करून फेकले पुलाजवळ, धक्कादायक घटनेने दिल्ली पुन्हा हादरली
आठ जणांनी आळीपाळीने या महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडित महिला आणि तिचा पती खडकीला चालले होते त्यावेळी ते फोटो काढण्यासाठी राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ थांबले होते. त्याचवेळी आठजणांचं टोळकं आलं. आणि त्यांना मारहाण करत महिलेवर बलात्कार केला.
या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून लोक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये तीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुन्हा ढगफुटी! मुसळधार पावसामुळे 90 जणांचा मृत्यू