महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ( महानंद) आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डला (NDDB) चालविण्यास देण्यात येणार आहे. कमी दूध संकलनामुळे महानंदला उतरती कळा लागली आहे. व्यवसायिकतेच्या अभावामुळे महानंद वर अशी परिस्थिती आली आहे.
मोठी बातमी! शेतातील पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ; वाचा सविस्तर
महानंदचे दैनिक दूध संकलन सध्या 25 हजार लिटरच्या घरात आले आहे. याआधी ते 11 लाख लिटरवर होते. यामुळेच महानंद मोठ्या अडचणीत आले आहे. महानंदच्या कामगारांचा पगार महिन्याला चार कोटी रुपयांच्या घरात आहे. हा पगार भागविण्याएवढी आर्थिक क्षमताही आता महानंदची राहिलेली नाही.
महाराष्ट्र दूध संघाचे ( MRSDMM) जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. राज्यातील 85 जिल्हा व तालुका सहकारी महासंघ महानंदचे सभासद आहेत. या सहकारी दूध संघांकडून महानंद दुधाची खरेदी करते. परंतु, वेळेत पैसे न दिल्याने या सहकारी दूध संघांनी देखील महानंद ला दूध देणे बंद केले आहे.
मोठी बातमी! वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती
या संदर्भात 3 नोव्हेंबर रोजी पुण्यातील विधान भवनात दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली आहे. सध्या महानंद चे अनेक प्रकल्प बंद पडले असून कोट्यवधींची गुंतवणूक व त्यासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा वाढत आहे.