
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central election Commission) धनुष्यबाणाचा (Dhanushy ban) निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. धनुष्यबाण चिन्ह नेमकं ठाकरे (Thackeray) गटाचं की शिंदे गटाचं याबाबत आज ४ वाजता निर्णय होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नच उत्तर आज मिळणार आहे.
ब्रेकिंग! तब्बल सहा तासाच्या चौकशीनंतर राखी सावंतची सुटका
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. यांनतर सतत सर्वाना प्रश्न पडत राहिले धनुष्यबाण चिन्ह नेमकं ठाकरे गटाचं की शिंदे गटाचं. या पार्शवभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिले. उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सगळे पवार चांगले..! त्यांची पॉवर कायम अशीच राहो; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकरात लवकर घेतला जावा, अशी मागणी शिंदे गटाकडून (Shinde group) निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जातोय.
राखी सावंतच्या अटकेनंतर शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा; म्हणाली, “तिचा पती माझ्याकडे…”