
Maharastra Politics । सध्या लोकसभा निवडणुकांची सगळीकडे धामधूम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते उमेदवारी न मिळाल्याने पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान सध्या देखील पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Madha Loksabha । शरद पवारांचा मोठा गेम, धैर्यशील मोहित पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश
भाजप पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात मोठ खिंडार पडणार असल्याची बातमी समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत कलहाचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला होताना दिसतोय. कारण भाजपच्या बड्या नेत्यांचा प्रवेश शरद पवार गटात होणार आहे. स्वतः शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Reliance Electric Car । मुकेश अंबानी करणार बडा धमाका, इलेक्ट्रिक कार बाजारात रिलायन्सची एंट्री
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, मागच्या काही दिवसापासून भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील मला भेटून गेले आहेत. ते येत्या दोन दिवसात पक्षात येणार आहेत अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. स्वतः शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवारातील गटाच्या पक्षप्रवेशाचे वृत्त अखेर खरं ठरलं आहे.
Viral News । भटक्या कुत्र्याचा मुलावर हल्ला, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल थरकाप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धैर्यशील मोहिते पाटील यांचा येत्या 14 एप्रिलला राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे. हा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडी कडून माढा लोकसभेसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप खासदार विरुद्ध पूर्वाश्रमीचे भाजपचे दिग्गज नेते अशी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.