Site icon e लोकहित | Marathi News

Maharastra Politics । वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबत; मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि उदय सामंत यांची बैठक

Maharastra Politics

Maharastra Politics । राजकीय वातावरण गरम झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) तयारी जोरात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यात मध्यरात्री उशीरा वर्षा बंगल्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला विशेष महत्त्व आहे कारण राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

Ajit Pawar । “मला मुख्यमंत्रिपद द्या…” अजित पवारांनी अमित शाहांकडे केली मागणी

बैठकीत प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य आमने-सामने येणाऱ्या जागांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लाडकी बहिण योजना कशा प्रकारे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता येईल यावरही सविस्तर चर्चा झाली आहे.

Sharad Pawar | निवडणुकीआधी ‘तो’ पक्ष शरद पवारांपासून दुरावणार? राजकीय वर्तुळात खळबळ

उदय सामंत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना योजनेचा प्रचार आणि प्रसार कसा वाढवता येईल यावर चर्चा झाली असल्याचे सांगितले. तसेच, काही न्यायालयीन अडचणी आणि योजनेच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेल्या अडथळ्यांवरही चर्चा करण्यात आली आहे.

Politics News । राजकारणातून मोठी बातमी समोर! भाजपचा बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला

महायुतीत विविध मतदारसंघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, असे समजते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वादग्रस्त मतदारसंघांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Reliance Jio च्या वर्धापनदिनानिमित्त धमाकेदार ऑफर; 700 रुपयांपर्यंतचा फायदा

पुढील काही दिवसांत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल आणि वादग्रस्त मतदारसंघांवर अंतिम निर्णय घेतला जाईल. अजित पवार यांच्या महायुतीत सामील होण्याच्या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर अनेक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार करत आहेत.

Devendra Fadnavis । चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कार प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Spread the love
Exit mobile version