Maharastra Politics । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते तसेच आरोप-प्रत्यारोप अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांवर करू लागले. त्यानंतर या दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केला. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.(Maharastra Politics)
निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना कार्यालयात बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह नेमक कुणाचं? या मुद्द्यावर लवकरच निवडणूक आयोगात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना 3 ऑक्टोबरला बोलावलं असल्याची देखील माहिती मिळत आहे.
Breaking News । मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? याचा लवकरच फैसला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने या सुनावणीसाठी दोन्ही गटांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Breaking News । मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे