Maharastra Rain । पाऊस नसल्यामुळे पीक वाया गेले, बापाने घेतलेले कर्ज कसे फेडायचं लेकासमोर प्रश्न; विषारी इंजेक्शन टोचून केली आत्महत्या

Beed News

Maharastra Rain । जुलै महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिना उजाडला आहे तरी देखील म्हणावा असा पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके करपून चालली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट घोंगावत आहे. त्यामुळे जर पीक आलं नाही तर घेतलेले कर्ज कस फेडायचा? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांचा त्यांच्या कुटुंबांना पडलेला आहे. आता यामध्ये एका शेतकरी पुत्राने टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती समोर आली आहे. (Beed News)

Maratha Reservation । “मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणं शक्य नाही” पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

बीड जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्या करण्याचे कारण असं की, पीक वाया गेल्यामुळे आपल्या शेतकरी बापाने घेतलेले कर्ज कसे फेडायचं त्याबरोबर आपल्यावर बेरोजगारीचा संकट याच विवंचनेतून २५ वर्षे शेतकरी पुत्राने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.

Tomato Rate । टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; थेट बाजारसमितीमध्येच टोमॅटो दिले फेकून

हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बापाला कर्ज फेडणे कठीण झालं. त्यात हा तरुण बेरोजगार असल्याने त्याला जास्तीच टेन्शन आलं. त्यामुळे या तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने स्वतःला विषारी इंजेक्शन खूपसून आपली जीवन यात्रा संपवली आहे. किरण पांडुरंग वाघ चौरे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर उधळला भंडारा, आंदोलकाला लाथा बुक्क्याने मारहाण; नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट

सध्या पाऊस नसल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती ही बिकटत होत चालली आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत तर काही शेतकरी पिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करत आहेत मात्र टॅंकरने तरी किती दिवस पाणीपुरवठा करायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Health Tips । सावधान! चुकूनही ‘या’ वस्तू ठेवू नका फ्रीजमध्ये, द्याल कॅन्सरला आमंत्रण

Spread the love