Maharastra Rain । पावसाचा मोठा कहर! ‘या’ ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत; जनावरे वाहून गेली..

Maharastra Rain

Maharastra Rain । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भ भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. या अतिवृष्टीने परभणी, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्यात पाणीच पाणी झालं आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घरं, मालमत्ता आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, तर काही ठिकाणी पाण्यामुळे उभी पिकं आणि जनावरं वाहून गेली आहेत.

Ajit Pawar । अजित पवारांची निवडणुकीआधी बारामतीकरांना साद; म्हणाले…

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या २४ तासांत ७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रभावित झाले आहे, आणि पावसामुळे आसना नदीला पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटीलांची मोठी घोषणा!

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ५२ महसूल मंडळांपैकी ५० मध्ये पावसाचा तडाखा आहे. हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले असून तापी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बाईकस्वार आणि एक ४५ वर्षीय व्यक्ती पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Pune Crime । पुण्यात थरारक घटना! माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुरग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. पावसाची स्थिती गंभीर असली तरी शासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले आहे.

Ajit Pawar । विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ; शिखर बँक घोटाळ्यावरील क्लीन चिटला विरोध

Spread the love