कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्याच्या (Karnataka Assembly elections) विजयानंतर महाविकास आघाडीची अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लगबग सुरू झाली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) राज्यात जोरदार बैठकसत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस एकत्रितरित्या लढून भाजपला हरवणार असं चित्र तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे. दरम्यान या त्रिकोणात आणखी एक कोन जोडला जाण्याची शक्यता आहे.
क्रिकेट प्रेमींसाठी समोर आली अतिशय वाईट बातमी! WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा सर्वात मोठा धक्का
पुढच्या आठवड्यात महाविकास आघाडीची मुंबईमध्ये (Mumbai) बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे.
Ayodhya Tour | शिंदे-फडणवीस पुन्हा एकदा आयोध्या दौऱ्यावर जाणार! तारीख ठरून तयारीही झाली सुरू…
याशिवाय अगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती देखील या बैठकीमध्ये ठरवण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या या महत्त्वाच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे. दरम्यान यामुळे राजकीय वर्तुळातील समीकरणे वेगाने बदलली जातील असे सांगितले जात आहे.
Gautami Patil | छोट्या पुढारीवर भडकली गौतमी पाटील; म्हणाली, “मी काय महाराष्ट्राचा…”