
सध्या राजकीय वर्तुळात पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या (Pimpri Chinchwad-Kasaba by-election) जोरदार चर्चा रंगल्या आहेत. काल भाजप आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. दरम्यान आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) एक विधान केले आहे. कसबा-चिंचवड पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
चिंचवड-कसबा पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांना फोन, चर्चांना उधाण
कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे राहुल कलाटे याना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय!
आम्ही सर्वे केला असून दोन्ही ठिकाणच्या निवडणुका व्हाव्यात अशी लोकांची इच्छा असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळं या निवडणुका लढवण्याचा महाविकास आघाडीनं निर्णय घेतला असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
ब्रेकिंग! गौतम अदानींनंतर रामदेव बाबांच्या कंपनीचे शेअर्स गडगडले