
Mahendra More । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव या ठिकाणी झालेल्या गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते मात्र उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nikhil Wagle । हल्ल्यानंतर निखिल वागळे यांनी सांगितला थरार; म्हणाले, “मरण डोळ्यासमोर…”
माहितीनुसार, 7 फेब्रुवारीला मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पाच तरुण तोंडाला रुमाल बांधून आले आणि या पाचही आरोपींच्या हातामध्ये पिस्तूल होते. ते पाचही आरोपी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता.
जळगावच्या चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला होता. महेंद्र उर्फ बाळू मोरे असं माजी नगरसेवकाचे नाव आहे. या गोळीबाराच्या घटनेत महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nikhil Wagle । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची गाडी फोडली