Mahendra More । बिग ब्रेकिंग! भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार

Mahendr More

Mahendra More । कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुखावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच सध्या देखील जळगावातून एक गोळीबाराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव मध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sharad Pawar । नरेंद्र मोदींनी नेहरुंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…

याबाबत अधिक माहिती अशी की, पाच तरुण तोंडाला रुमाल बांधून आले आणि या पाचही आरोपींच्या हातामध्ये पिस्तूल होते. ते पाचही आरोपी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी माजी नगरसेवकावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित घटनेचा गोळीबाराचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला नाही, पण आरोपी कारमधून बाहेर उतरताना. हातात बंदूक घेऊन नगरसेवकाच्या कार्यालयात शिरल्याचे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

UP Politics । इंडिया आघाडीला मोठा धक्का! रालोद भाजपसोबतच जाण्याच्या तयारीत

जळगावच्या चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महेंद्र उर्फ बाळू मोरे असं माजी नगरसेवकाचे नाव आहे. सध्या मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस आरोपींच्या शोधात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

UP Politics । इंडिया आघाडीला मोठा धक्का! रालोद भाजपसोबतच जाण्याच्या तयारीत

Spread the love