Site icon e लोकहित | Marathi News

Mahesh Gaikwad Health Update । शिंदे गटाचे महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर; प्रकृती अतिशय चिंताजनक

Mahesh Gaikwad

Mahesh Gaikwad Health Update । भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांसमोरच सहा गोळ्या झाडल्या. राजकारण आणि जागेच्या वादावरून हा गोळीबार झाला असल्याचे बोलले जात आहे. महेश गायकवाड यांच्यासोबत राहुल पाटील हे देखील गोळीबारात जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातूनही डॉक्टरांनी दोन गोळ्या बाहेर काढल्या आहेत. (Ganpat Gaikwad Firing)

Ajit Pawar । गोळीबाराच्या घटनेवर अजित पवार यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढी टोकाची मजल…”

जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना अटकही करण्यात आली आहे. डॉक्टरांनी महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या बाहेर काढल्या. महेश गायकवाड यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळलेला नाही. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.

Ganpat Gaikwad News । ब्रेकिंग! आमदार गणपत गायकवाड यांना मोठा धक्का; गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आमदारकीही जाणार?

गोळीबारावर गणपत गायकवाड यांनी दिली प्रतिक्रिया

याबाबत बोलताना भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले, “महेश गायकवाड यांनी पोलीस स्टेशन बाहेर शेकडो मुलं जमा केली होती. ते माझ्या मुलाच्या अंगावर धावून आले. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही म्हणूनच मी गोळीबार केला. असं आमदार गायकवाड यांनी सांगितलं. त्याचबरोबर, जर माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला कोणी काय करत असेल तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. असं देखील आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटल आहे”.

Mla Ganpat Gaikwad । गोळीबारानंतर भाजप आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यावर केले गंभीर आरोप; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी माझे करोडो रुपये…”

Spread the love
Exit mobile version