
Mahesh Gaikwad । उल्हासनगर मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing) यांनी पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यामध्येच आता याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे.
महेश गायकवाड यांच्या विरोधात कल्याण मधील बांधकाम व्यवसायिकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यवसायिकाने शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केला आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणांमध्ये शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील, अक्षय दिनेश गायकवाड, किरण फुलोरे, सुनील जाधव, एकनाथ जाधव आणि इतर 70 लोक लोकांचा समावेश आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
Maratha Reservation । मोठी बातमी! मनोज जरांगे करणार पुन्हा आमरण उपोषण