Mahesh Gaikwad । भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारामध्ये महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी जखमी झाले होते. दरम्यान आता त्यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 14 दिवसानंतर उद्या ज्युपिटर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
Maratha Reservation । ब्रेकिंग न्युज! मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर हीललाईन पोलीस स्टेशनमध्येच २ फेब्रुवारीला महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. जमिनीच्या वादावरून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबाराच्या घटनेत महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून महेश गायकवाड यांच्या शरीरातून ६ गोळ्या काढल्या तर राहुल पाटील यांच्या शरीरातून २ गोळ्या काढण्यात आले आहेत.
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने उद्या रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोघांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.