Mahesh Gaikwad News । मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील कल्याण उल्हास नगर परिसरात शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर ठाणे पोलीस ठाण्यात गोळीबार केला. 13 सेकंदात भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात ६ राऊंड फायर केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात शिंदे गटाच्या नेत्याशिवाय आणखी एकाला गोळी लागली. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचवेळी गोळीबाराच्या घटनेनंतर आता पोलीस प्रशासनाने आरोपी आमदार गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान आता महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्याचबरोबर राहुल पाटील यांच्या शरीरातून देखील दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या आहे, असं कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितलं आहे.
BJP Mla Firing । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार
पोलिस अधिकाऱ्यांसमोर गोळ्या झाडल्या
कल्याणचे माजी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गायकवाड हे काही आपसी वादातून हिल लाइन पोलिस ठाण्यात गेले होते. पोलीस अधिकाऱ्याशी झालेल्या संवादादरम्यान हा वाद इतका वाढला की भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लगेचच ५ राऊंड फायर केले.
Crime News । लग्नाच्या चर्चेने घेतला प्रेयसीचा जीव, प्रियकराने आधी तिचा गळा दाबून खून केला आणि..