Mahesh Gaikwad । भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. या घटनेमध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. दरम्यान आज त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. यानंतर महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी महेश गायकवाड यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी सर्व कार्यकर्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
यानंतर महेश गायकवाड हे आपल्या राहत्या घरी दाखल झाले. मात्र त्यानंतर महेश गायकवाड यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. महेश गायकवाड यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे डॉक्टरांची एक टीम त्यांच्या घरी दाखल झाली आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
सध्या डॉक्टरांची टीम महेश गायकवाड यांच्या घरी दाखल झाली असून त्यांची तपासणी करत आहे. महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातून शस्त्रक्रिया करून सहा गोळ्या काढण्यात आल्या आहेत.
Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा