Site icon e लोकहित | Marathi News

Abhishek Ghosalkar | “…तर अभिषेक घोसाळकर यांचा जीव वाचला असता”

Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या (Abhishek Ghosalkar Murder) केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून आरोपी मॉरीस नरोना (Maurice Narona) यानेही स्वत:वर झाडल्या आहेत. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराने मनसेला ठोकला रामराम

या थरारक घटनेचा एकूण घटनाक्रम पाहिला तर घोसाळीकर यांचा जीव वाचण्याची शक्याता होती असं दिसत आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अभिषेक घोसाळीकर उपस्थित नव्हते मात्र पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला आधी गेले असते तर कदाचित ते आज या जगात असते. असे बोलले जात आहे.

Abhishek Ghosalkar । ब्रेकींग! अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर

कोण आहे अभिषेक घोसाळकर? (Who is Abhishek Ghosalkar?)

अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला सामाजिक कार्य सुरू केले. यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. अभिषेक घोसाळकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. दहिसरमध्ये त्यांच्याकडे तरुण आणि उत्साही नेता म्हणून पाहिले जाते. अभ्यासू आणि उत्साही नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक होते. सध्या हा प्रभाग शीतल म्हात्रे यांच्या ताब्यात आहे.

Buldhana Bus Accident । एसटी-बस आणि ट्रकचा भीषण अपघात, एकजण जागीच ठार तर १५ प्रवासी गंभीर जखमी

Spread the love
Exit mobile version