‘माझी तुझी रेशीमगाठ’ ( Mazi Tuzi Reshimgath) ही झीमराठी वाहिनी वरील मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मागील काही दिवसांत या मालिकेचा टीआरपी घसरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे व अभिनेता श्रेयस तळपदे यांसारखे मोठे कलाकार प्रमुख भूमिकेत असणारी ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
मोठी बातमी! गडकरींना आलेल्या धमकीच्या फोन कॉलचे कर्नाटक कनेक्शन?
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने ( Prarthana Behare) काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओ सोबत तिने लिहिले होते की,”शूटिंगचा शेवटचा दिवस”. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रार्थना बेहरे लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर पळताना दिसत आहे. यावरून लक्षात येते की ही मालिका आता बंद होत आहे.
पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणाऱ्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
या मालिकेच्या अगामी भागात अनुष्काला तिचा भूतकाळ आठवणार आहे. सुरुवातीला जास्त टीआरपी असणारी ही मालिका आता टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आहे. या आठवड्यात या मालिकेला फक्त 1.6 रेटिंग मिळाले आहे. पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या सिंगल मदर म्हणजेच नेहाचे लग्न एका उच्चशिक्षित व श्रीमंत मुलाशी होते. अशी या मालिकेची कथा आहे.
धक्कदायक! शेअर मार्केटमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबानेच केली आत्महत्या