
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्याला प्रकल्प मिळतोय तर त्यात गैर काहीच नाही. पण महाराष्ट्राचा प्रकल्प दुसरीकडे जाणे हे खूप मोठं दुर्दैव आहे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
Supriya Sule: मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करून राज्याच्या विकासाचं पहावं – सुप्रिया सुळे
लाखो तरुणांच्या नोकऱ्यांच्या संधी जाणार आहेत, त्यामुळे सरकारला विनंती आहे की राजकारण करण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन याकडे लक्ष द्यावे. असंही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कामाकडे लक्ष द्यावे. असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी (Narendr Modi ) यांचा फोनवरून साधला. यावेळी पंतप्रधानांनी याहून मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं.
wheat: गव्हाची पेरणी करताय? तर मग या आहेत गव्हाच्या टॉप जाती; उत्पन्न निघेल भरघोस
या आश्वासनाचा समाचार घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की. “मी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की, त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं, आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ…” असा उपरोधिक टोला देखील सुप्रिया सुळेंनी लगावलाय. मोदींच्या महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देण्याच्या आश्वासनावर देखील सुळेंनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे एक फिरणारे आणि दुसरे मंत्रालयात बसून काम करणारे.
Bachhu kadu: आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने सुनावली 14 दिवसाची कोठडी, कारण…