पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections) वारे जोरदार वाहत आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान सर्वच प्रमुख पक्षातील राजकीय नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. एकीकडे भाजप तर दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तर प्रचारादरम्यान चांगलीच चढाओढ लागली आहे.
“संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार”, निलेश राणेंचे ट्विट चर्चेत
चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, ” माणूसकी आणि विश्वास यांच्या पाठीत खंजीर खूपसून चाळीस गद्दारांकडून भाजपाला हाताशी धरून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, शिवसेना कधीच संपणार नाही. ती अधिक ताकदीने उभी राहणार आहे.”
दरम्यान शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गद्दारांना आणि भाजपाला धडा शिकविण्याची संधी चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. यामुळे बेईमान आणि गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान करून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना विजयी करावे. असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी रॅली दरम्यान केले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित होते.
ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट; ऊस तुटला जाईल की नाही? या भीतीचा घेतला जातोय फायदा