
सांगली शहराला पुणे बंगळुरु महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून अर्धवट आहे. रस्त्याचे काम पुर्ण होत नसल्यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. हा रस्ता केंद्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असून या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम नितीन गडकरी यांचे हस्ते पार पडला.
‘मन उडू उडू झालं’ मधील इंद्रा अडकला लग्नबंधनात! सोशल मीडियावरून दिली माहिती
दरम्यान, यावेळी कार्यक्रमात बोलताना, नितीन गडकरी ठेकेदारांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नितीन गडकरी म्हणाले, जर रस्त्याच्या कामात गडबड कराल तर थेट बुलडोझर घालू असे. असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी यांना शांत स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात मात्र आता त्यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
‘या’ आजारामुळे अनंत अंबानीचे वजन वाढले आहे, नीता अंबानी यांनी केला मोठा खुलासा
रस्त्याच्या कामाला एका महिन्यामध्ये सुरुवात होईल. आणि रस्ता एवढा मजबूत करण्यात येईल की पुढच्या २५ वर्षांमध्ये या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही, असे काम केले जाईल, असा विश्वास देखील यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रस्ता चांगला करा, नाहीतर ठेकेदारालाच बुलडोझर खाली टाकू, असा गंभीर इशारा देखील यावेळी नितीन गडकरी यांनी दिला आहे.