Site icon e लोकहित | Marathi News

साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करा, राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी

Make weighing forks of sugar factories online immediately, Raju Shetty's demand to the Controller of Medical Measurement

आपण नेहमी पाहतो, अनुभवतो किंवा आपल्याला पक्क माहीत असते की बऱ्याचदा बाजार समिती किंवा साखर कारखाने (Sugar factory) यामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल मोजताना काटामार केली जाते. या काटामारीच्या घटनांसंबंधीच्या अनेक तक्रारी देखील दाखल होत असतात. परंतु या सगळ्यात काटामारीमुळे शेतकऱ्यांना (farmers) मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. त्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजन काटे (Weight forks) तातडीने ऑनलाईन करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी ही मागणी (demand) राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वैद्यमापन नियंत्रण डॉ.रवींद्र कुमार सिंघल यांच्याकडे केली आहे.

अभिनेत्री अमृता सुभाष ४३ व्या वर्षी होणार आई?, इन्स्टाग्राम पोस्टने वेधल सर्वांचं लक्ष

त्यामुळे आता डॉ.रवींद्र कुमार सिंघल यांनी साखर कारखान्यांचे वजन काटे हे संगणकीय प्रणालीद्वारे एकत्र करून तातडीने ऑनलाइन करण्याचे निर्देश देखील संबंधित विभागाला दिले. राज्यातील कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करून त्या काट्यांचे कॅलिब्रेशनमध्ये पारदर्शकता आणून संगणक प्रणाली एकच ठेवावी, इतकंच नाही तर वजन काट्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन विभागाकडूनच व्हावी अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी यावेळी केली. साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्यासंबंधीचा ठराव हा जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत एक मुखाने घेण्यात आला होता.

कोंबड्याच्या ऐवजी कुर्बानी देणाऱ्याचाच गेला बळी, वाचा संपूर्ण घटना

महत्वाची बाब म्हणजे बऱ्याचदा साखर कारखानदार खाजगी काट्यावर वजन केलेला ऊस नाकारात असल्याच्या तक्रारी समोर आले आहेत. शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाही. म्हणून हा विषय फार गंभीर आहे. यासाठी वैद्य मापन विभागाकडून त्वरित कार्यवाही करून साखर कारखान्याचे वजन काट्यांच्या कॅलिब्रेशन मध्ये एकसमानता, सुसूत्रता व पारदर्शकता राहण्यासाठी सर्व वजन काट्यांची ऍक्टिव्ह संगणक प्रणाली एकच असणे गरजेचे आहे. तसेच वजन काट्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैध मापन विभागाकडून व्हावे यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. महत्वाची बाब म्हणजे उसाचे वजन काटे हे अचूक असणे खूप गरजेचे आहे कारण बऱ्याचदा वजन काट्यांमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे वजनामध्ये मोठा फरक दिसून येतो.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, गायीच्या तोंडात फोडला फटका; जबडाच झाला उद्ध्वस्तच

Spread the love
Exit mobile version