भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने भोजपुरी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीने वयाच्या २५व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे.
मोठी बातमी! मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग; दोन दुकान जळून खाक
या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे सामोर येत आहेत. यामध्येच आता आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्टने मोठा खुलासा केल्याची माहिती सामोर आली आहे. याबाबत बोलताना मेकअप आर्टिस्ट म्हणली, ” आकांक्षा तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. मात्र, मेकअप आर्टिस्टने या पार्टीबाबत जास्त कोणतीही महीती दिलेली नाही. मात्र या खुलास्यामुळे या घटनेला पुन्हा एकदा नवं वळण लागण्याची शक्यता आहे.
सरकारी जाहिरातीवरून अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “हजारो कोटी रुपयांचा खर्च…”
दरम्यान, आकांक्षा दुबे ही प्रसिद्ध अभिनेत्री होती. ही अभिनेत्री दिसायला देखील खूप सुंदर होती. ती तिचे फोटो व व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत होती. आकांक्षाचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आकांक्षाच्या अचानक जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कांदा प्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “कांद्याला किती खोके…”