मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका (Malaika Arora) अरोरा सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या खासगी आयुष्याबद्दल पाहिलं तर अरबाज खान आणि मलायकाने १८ वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेतला होता. मलायका घटस्फोट घेण्याच्या आधीपासूनच मलायकाने अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत होती. आता मलायकाने तिचा घटस्फोट, नातेसंबंध आणि मुलगा अरहान या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू करायचाय? मिळतेय बंपर सबसिडी आणि कमवा बक्कळ पैसा
अरबाज खान जॉर्जिया एड्रियानीला डेट करत होता त्यामुळे मलायका आणि त्याच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. त्यानंतर ते १८ वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये विभक्त झाले. मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान खान आता १९ वर्षांचा आहे. तर सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहेत.
‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीला चार ते पाच हजारांचा दर
एका मुलाखतीमध्ये मलायकाला प्रश्न विचारण्यात आला. “आजही तुझे अरबाजशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत का?” यावर उत्तर देत मलायका म्हणाली, “आता आमच्यामध्ये चांगले संबंध आहेत आम्ही दोघे देखील समजूतदार आहोत. अरबाज खूप चांगला आहे. माझी इच्छा आहे की, त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व सुख मिळो. कधी कधी असं होतं की माणसं चांगली असतात. फक्त ती एकत्र असणं चांगलं नसतं. पण त्याच चांगलं व्हावं असं मला कायम वाटत”. या शब्दांमध्ये मलायकाने उत्तर दिले.
आजपासून सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागणार; शासननिर्णय जारी