मलायकाने अर्जुनचा सेमी न्यूड फोटो केला व्हायरल; नेटकरी भडकले! म्हणाले, “तुझ्या मुलाच्या…”

Malaika's semi-nude photo of Arjun went viral; The Netkari flared up! Said, "Your son's..."

अभिनय क्षेत्रातील सेलिब्रिटींचे प्रेम संबंध (love affairs) नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय ठरतात. सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malayaka Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांचे रिलेशनशिप तर कायम चर्चेत असते. अर्जुन आणि मलायका नेहमीच खुलेपणाने आपले एकमेकांबद्दल असणारे प्रेम व्यक्त करताना दिसतात. दरम्यान नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये (Instagram story) अर्जुनचा एक फोटो पोस्ट केला. मात्र, हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून यावरून मलायकाला ट्रोल केले जात आहे.

कांद्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी चिंतेत! खर्च केलेले पैसे निघत नसल्याने शेतकऱ्याने कांदा पेटवला

मलायकाने पोस्ट केलेला अर्जुनचा हा फोटो सेमी-न्यूड आहे. यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. ‘माझा आळशी मुलगा’ असे कॅप्शन देऊन मलायकाने अर्जुनचा फोटो पोस्ट केला होता. तसेच या फोटोसोबतच मलायकाने ‘if you know you know’ असा हॅशटॅग वापरला आहे. यावरून तिने अर्जुनसोबतच्या खासगी क्षणांचा उल्लेख केल्याचे अगदी स्पष्ट होत आहे.

बिग ब्रेकिंग! मुंबईमध्ये आमदाराच्या घरात २५ लाखांची चोरी

मलायकाची ही अतिशयोक्ती नेटकऱ्यांना पसंत पडली नसून यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर मला या दोघांमधील वयाच्या अंतराने फरक पडत नाही. प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात प्रेमाची गरज असते. मात्र मलायका ही एका किशोरवयीन मुलाची आई आहे आणि ती सोशल मीडियावर अशी वागतेय हे पाहून खूप वाईट वाटतंय’ अशी कमेंट एका व्यक्तीने या फोटोखाली दिली आहे. ‘किमान मुलाचा तरी विचार कर. त्याच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्याला किती ट्रोल केलं जाईल, याचा जरासुद्धा विचार आला नाही का ? ‘ असा प्रश्न देखील एका युजरने उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ 17 जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *