Mallika Rajput Death । सध्या मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री-यूट्यूबर मल्लिका राजपूत उर्फ विजयालक्ष्मीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे अभिनेत्रीचा मृत्यू झाला. मात्र, ती आईसोबत मुंबईत राहत होती. पण या दिवसात ती गावी आली होती. 13 फेब्रुवारीला तिचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. अभिनेत्रीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Devendra Fadnavis । विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये कसे येतात? फडणवीसांनी सांगितली माहिती
वृत्तानुसार, 13 फेब्रुवारीला गायिका-अभिनेत्री मल्लिकाचा मृतदेह तिच्या घराच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. ही तीच मल्लिका राजपूत आहे जी रिव्हॉल्वर रानी या हिंदी चित्रपटातही दिसली होती. याशिवाय ती भारतीय जनता पक्षाची सदस्य देखील होती.
Ashok Chavan । ब्रेकिंग! अखेर अशोक चव्हाण यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
2018 मध्ये तिने भाजपचा राजीनामा दिला. अभिनेत्री मुंबईत राहत होती. जिथे तिने आपल्या अभिनय आणि गायनाच्या कारकिर्दीसह एक यूट्यूब चॅनेल देखील चालवले. चार वर्षांपूर्वी तिचा विवाह प्रदीप शिंदे नावाच्या व्यक्तीशी झाला. अभिनेत्रीला तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या, त्यामुळेच तिने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.