
Mamata Banerjee Accident । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वर्धमानहुन एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. गाडीने अचानक ब्रेक मारल्याने ममता यांच्या कपाळावर जखम झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताबाबत जास्तीची माहिती अजून समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार मुख्यमंत्री ममता यांची गाडी भरधाव वेगाने जात होती. यावेळी वाटेत एक उंच जागा आली आणि चालकाने अचानक ब्रेक दाबला. गाडी वेगात होती आणि अचानक ब्रेक लागल्याने कार मध्ये बसलेल्या लोकांचे संतुलन बिघडले त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर जखम झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ममता बॅनर्जी यांची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र कपाळावर किरकोळ जखम झाली असल्याचे बोलले जात आहे.