महिलेने ओव्हरटेक केल्याने व्यक्तीने तिला भरचौकात केली मारहाण; पाहा VIDEO

Man assaults woman as she overtakes; Watch the VIDEO

सध्या नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने ओव्हरटेक केल्यामुळे व्यक्तीने संतापून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना भरचौकात घडली असू या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अमृता आमची लहान सूनबाई, त्यामुळे…”

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पुरुष भर चौकात महिलेला मारहाण करताना दिसत आहे. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त करत. मारहाण करणाऱ्या पुरुषाला अटक करण्याची मागणी केली आहे.

रोहित पवारांना मोठा धक्का! बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल

याबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे.” अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

शेतकरी कुटुंबातील मुलांची कमाल, मिळाले 18 लाखांचे पॅकेज..!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *