Slap PM । राज्यात लवकरच निवडणुका (Election) पार पडणार आहेत. सर्व नेतेमंडळी आतापासून निवडणुकीची तयारी करू लागले आहेत. परंतु, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दुसऱ्या गटात प्रवेश करत आहेत. याचा परिणाम येत्या निवडणुकीवर होईल. दरम्यान, निवडणूक प्रचारावेळी एक वेगळाच प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)
नेपाळमधील (Nepal) हा संपूर्ण प्रकार आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) हे निवडणूक प्रचारासाठी एका मतदारसंघात गेले होते. तेव्हा एक व्यक्ती हार घालण्याच्या बहाण्याने पुढे आला, त्याने त्यांचं स्वागत केले आणि त्यांना लगेचच चापट (Man slaps former Prime Minister In Nepal) देखील मारली. तो चापट मारून पळून जाण्याच्या प्रयत्न करत होता, मात्र त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. (Man slap PM in campaign)
#WATCH | Dhankuta, Nepal | Koshi Province, Police DIG Rajeshnath Bastola says, "A person tried to physically assault former PM and opposition leader KP Sharma Oli during a publicity campaign earlier today.
— ANI (@ANI) December 14, 2023
(Video source: Social media, confirmed by Police) pic.twitter.com/VQhYwavCoi
दरम्यान, या व्यक्तीने केपी शर्मा ओली यांच्यावर हल्ला का केला? त्याचा उद्देश काय होता ? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी सध्या या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. खरंतर ओली त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांचा चापट मारल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे.
Shreyas Talpade । मोठी बातमी! शूटिंगवरून परताना श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल