
Manikrao Kokate । नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपावरून 2 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच त्यांना 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना शासनाकडून सदनिका मिळवताना फसवणूक केली होती, असा आरोप माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1997 मध्ये केला होता.
Chhava Movie | धक्कादायक! ‘छावा’ चित्रपटादरम्यान प्रेक्षकाने केला राडा; सिनेमागृहाचा पडदाच फाडला
या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू प्रमुख आरोपी होते. याबाबत तक्रार नाशिक सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने चार आरोपींना दोषी ठरवले असून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूला शिक्षेचा सामना करावा लागला आहे.
GBS । धक्कादायक! अचानक अशक्तपणा, जुलाबाचा त्रास, GBSने आणखी दोन जणांचा मृत्यू
न्यायालयाने कारावासाची शिक्षा दिल्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकी रद्द होऊ शकते. भारतीय संसद आणि राज्य विधानमंडळाचे सदस्यत्व दोन किंवा अधिक वर्षांच्या शिक्षा झाल्यास रद्द होते, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना राजकीय वादाची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या दुसऱ्या मंत्र्यावर संकट आले आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील पावले काय असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Bjp । भाजप ठरला सर्वात श्रीमंत पक्ष; काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी वाढ, ‘आप’ आणि बसपाला तोटा