Manipur Violence । मणिपूर । मागच्या काही दिवसापासून मणिपूर मधील स्थिती अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी जातीय हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान दोन महिलांना नग्न फिरवल्याची घटना देखील समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यादरम्यान सरकारी यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी मणिपूरमधील सर्व घटनांचा तपास वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आमचे पाळत ठेवण्याचे प्रयत्न वाढविले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील विशेष लक्ष केंद्रित करून चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर मणिपूरच्या १६ जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यामध्ये अजूनही शांतता प्रस्थापित झालेली नाही असं देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Manipur Violence)
हत्या की आत्महत्या? घरात सापडले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह
दरम्यान, मणिपूर या ठिकाणी अशांततेची सुरुवात ही कुकी आणि मेईतेई यांच्यातील हिंसक संघर्षाने झाली आहे. या संघर्षांमध्ये आतापर्यंत किमान १२५ लोक मरण पावले आणि ४०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मणिपूर मधील स्थिती भयंकर असल्याचे बोलले जात आहे.