Manipur Violence । मणिपूर : मागच्या काही दिवसापासून मणिपूरमधील अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार देखील मागच्या दोन-चार दिवसांपूर्वी समोर आला होता, त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्व लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. मात्र त्यानंतरही मनिपुर मधील हिंसाचार थांबताना दिसत नाही. दरम्यान आता पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार मणिपूरमध्ये समोर आला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा मांडवगण ग्रामपंचायत वर धडक मोर्चा
मणिपूर मध्ये एका महिलेसोबत विनयभंगाची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे बीएसएफच्या हेडकॉन्सेबल वर एका किराणा दुकानात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना दुकानांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा सगळीकडे खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये एक बीएसएफचा जवान हातात रायफल घेऊन महिलेचा विनयभंग करताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. मणिपूरमधील होणाऱ्या या घटना कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Onion Rate । कांद्याचा पुन्हा वांदा.. ठेवला तर सडतोय अन् विकला तर भाव नाही