मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बुधवारी आदिवासींच्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला होता. यानंतर 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात कलम 144 लागू आहे. संपूर्ण राज्यात 5 दिवस इंटरनेट सेवा बंद आहे. (Manipur Violence Update)
Sara Ali Khan । सारा अली खानचा स्विमिंग पुलमधील ‘तो’ फोटो व्हायरल; फोटोमधील मुलगा नक्की आहे तरी कोण?
ठिकठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या, पण हिंसाचार थांबला नाही. आता लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ५५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने बदमाशांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. इशारे देऊनही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे राज्यपालांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
Anil Dujana | मोठी बातमी! उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका गँगस्टरचा इन्काऊंटर; जागीच झाला ठार