दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आपल्या पत्नीससोबत गाझियाबादच्या वसुंधरा सेक्टर 4 येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाणार आहेत. या ठिकाणी सीबीआय त्यांची भेट घेऊन मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची चौकशी करणार आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची सीबीआय आज चौकशी करणार आहे.
Onion-Tomato: बापरे! या ठिकाणी कांदा 400 रुपये आणि टोमॅटो चाललाय 500 रुपये किलो
माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणावर मनीष सिसोदिया म्हणाले होते की,”माझ्या घरावर 14 तासांच्या छाप्यात जसे काही सापडले नाही, तसेच बँक लॉकरमध्येही काहीही सापडणार नाही. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन”.
दरम्यान, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात CBI FIR मध्ये नोंदवण्यात आलेल्या 15 लोक आणि संस्थांमध्ये आम आदमी पार्टी (AAP) नेते सिसोदिया यांचा समावेश आहे. या प्रकरणी सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी सिसोदिया यांच्या निवासस्थानासह 31 ठिकाणी छापे टाकले होते.
Eknath Shinde: पोलीस, अग्नीवर भरतीसाठी तरुणांना आवश्यक सुविधा पुरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
मनीष सिसोदिया ट्विट करत म्हणाले की, ‘उद्या सीबीआय आमचे बँक लॉकर पाहण्यासाठी येणार आहे. 19 ऑगस्ट रोजी माझ्या घरावर 14 तासांच्या छाप्यामध्ये काहीही सापडले नाही. लॉकरमध्येही काहीही सापडणार नाही. CBI मध्ये आपले स्वागत आहे. तपासात मला आणि माझ्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य असेल.”