
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनर या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड यांनीही शपथ घेतली. या शपथविधीनंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राठोडांवर (Sanjay Rathod) जोरदार टीका केली होती आता यावर प्रतिक्रिया देत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांना एकत्र येऊन महिलांच्या सन्मानासाठी लढावे, असे आवाहन केले आहे.
मनिषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या, “संजय राठोड यांना मंत्री केल्यामुळे चित्रा वाघ या प्रचंड अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांनी आकाडतांडव सुरू केला आहे. मला त्यांना ए़ढंच विचारायचं आहे की राहुल शेवाळे असतील किंवा संजय राडोड असतील, याचं वस्रहरण करण्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी एकत्र येण्याची तुमची तयारी आहे का?”, असं प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलं.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या होत्या की, “पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे”