Manodhairya Scheme । शिंदे सरकारचा धडाकेबाज निर्णय! पीडित महिला आणि बालकांना मिळणार १० लाख रुपयांपर्यंत मदत

Manodhairya Scheme

Manodhairya Scheme । बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यामुळे पीडितांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे बलात्कार, ऍसिड हल्ल्यातील पीडित महिला त्याचबरोबर बालके यांच्या पुनर्वसनासाठी आणि आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मनोधैर्य योजना (Manodhairya Scheme) राबविण्यात येते. आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा निधी वाढवण्यात आला असून तब्बल १० लाखापर्यंत वाढवण्यात आला आहे.

Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट, या दिवशी होणार सभागृहात चर्चा

हिवाळी अधिवेशनामध्ये महिला धोरण आणण्याआधी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर डिझेल, रॉकेल, पेट्रोल, स्वयंपाक गॅस यासारख्या पदार्थांचा समावेश करून मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. नियोजन वित्त विधी व न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर दोन्ही विभागांनी याला मान्यता दिली असून याबाबत सुधारित प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात लवकरच मांडण्यात येणार आहे.

Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती

१० लाखांपर्यंत मिळणार मदत

पीडित महिला आणि बालकांना विविध अपघातांमध्ये यापुढे १०लाखापर्यंत मदत मिळणार आहे. महिला व बालविकास खाते अंतर्गत प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर अपघाताने पीडित महिलांना बळ देण्यासाठी संबंधित घटनांच्या संनियंत्रणासाठी Software व web Portal तयार करण्यात येणार आहे.

Accident News । क्षणात सर्वकाही उध्वस्त झालं! कार आणि बाईचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Spread the love